सरकारी जमिनीवर कब्जा करत अवैध मशिदीचे बांधकाम

दाऊद इब्राहिमच्या नावाने दिली धमकी

    30-Oct-2024
Total Views |
 
illegal mosque
 
कुशीनगर : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात सरकारी जमीनीवर कब्जा करुन मशीद आणि ईदगाह बांधल्याचे प्रकरण आहे. हिंदू तक्रारदाराला दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावले होते. जिल्ह्यातील तहकुहीराज येथे गहाडिया चिंतामणी गावात रस्त्याच्या कडेला ही धार्मिक स्थळे बांधण्यात आली आहेत.
 
राज्यात समाजवादी पक्षाचे जेव्हा सरकार होते तेव्हा हे बांधकाम करण्यात आले होते. याप्रकरणी गावाचे प्रमुख इस्लाम अन्सारी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले गेले. प्रशानाने या प्रकरणाचा तपास केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, याच गावातील रवींद्र शाही यांनी या रस्त्याच्या कडेला मोठी जागा बळकावत मशीद आणि ईदगाह बांधण्यात आल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. या धार्मिक स्थळांमुळे नागरिकांच्या वाढत्या संख्येने रहदारी निर्माण होत असल्यची समस्या आहे.
 
गढिया चिंतामणी गावचे माजी प्रमुख इस्लाम अन्सारी यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहे. शाही यांच्या म्हणण्यानुसार, इस्लाम अन्सारी यांना समाजवादी पक्षाच्या सरकारचा अभिमान होता.
 
दरम्यान, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, महसूल विभागाच्या पथकांने घटनास्थळाची चौकशी करुन अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. या अहवालात अवैध मशीद आणि ईदगाह सरकारी जमिनीवर बांधण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, या अहवालावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
 
याप्रकरणात त्यांनी तक्रार केली तेव्हापासून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा फोटो प्रोफाईलला जोडला होता.
 
हिंदू संघटनेने हनुमान चालिसा पठणाची केली घोषणा
 
मशीद आणि ईदगाह बेकायदेशीर ठरवत हिंदू संघटनांनीही मोर्चेबांधणी केली आहे. हे बेकायदा बांधकाम तत्काळ पाडण्याची मागणी कुशीनगरच्या ‘सनातन सेना’ या हिंदू संघटनेने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
 
त्याच ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल, असे संघटनेचे प्रमुख अर्जुन किशोर यांनी सांगितले. या बेकायदा बांधकामाबाबत इस्लाम अन्सारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सनातन सेनेने लावून धरली आहे.