बारामती : ( Sharad Pawar - NCP ) "हा प्रश्न भावनेचा नसून हा तत्वाचा आहे, गांधी, नेहरू आणि यशवंतराव चव्हाण तसेच शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन मी काम करणारा आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोयं त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची आहे. महाराष्ट्राची सत्ता सामान्य माणसासाठी सत्ता हातात घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा, आपल्याला सामाजिक क्षेत्रात आणखी काम करायचे आहे," असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या ५२ मनिटांच्या भाषणात शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेखही केला नाही.
बारामतीत अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत शरद पवारांनी भाषण केले. यावेळी पवारांचे नातू तसेच अजित पवारांचे पुतणे उमेदवार युगेंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. शरद पवारांनी यावेळी अजितदादांची नक्कल करत डोळे पुसले. येत्या निवडणूकीत कुणीही भावनाप्रधान होऊ नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. अजित पवारांनी केलेल्या घर फोडण्याच्या आरोपालाही शरद पवारांनी उत्तर दिले. मी कधीही आयुष्यात कुणाची घरे फोडली नाहीत, असे प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले. लोकसभेला काय झालं ते लक्षात राहू द्या, असे आवाहन त्यांनी केले. शरद पवारांनी अजितदादांची नक्कल केल्यानंतर कार्यकत्यांनीही घोषणाबाजी केली.
हा प्रश्न भावनेचा नाही तर हा तत्व आणि विचाराचा आहे, गांधी-नेहरू आणि यशवंतराव चव्हाण, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू राजे यांची विचारधारा ही माझी पद्धत आहे. यापुढे माझी विचारधारा नाही, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले. "गेले सहा महिने महाराष्ट्रातील कित्येक तालुके मी पालथे घातले आहे. कारण मला महाराष्ट्रातील सत्ताबदलायची आहे, ते करायचे असेल तर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून एकजूटीने मिळून शक्ती एकवटण्याची करण्याची गरज आहे.", असे आवाहन त्यांनी केले. तसेच जनाई शिरसाई योजनेवरुनही त्यांनी अजितदादा पवार यांना लक्ष्य केले आहे. मी निवडणूकीला आता नव्या पिढीचा उमेदवार दिला आहे.
"मला तुम्ही वयाच्या २७व्या वर्षी संधी दिलीत, त्यानंतर अजितदादांना संधी दिली, आता युगेंद्र पवार यांना निवडून देण्याची वेळ आहे, असेही ते म्हणाले. युगेंद्र अमेरिकेतून शिकून आला आहे. हुशार आहे. जी जी जबाबदारी दिली ती चांगल्या पद्धतीने पार पाडली, त्यांची खूण तुम्ही लक्षात ठेवा", असे आवाहनही त्यांनी केली. "सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होईल, त्यावेळी तिकडच्यांनी सांगितलं होतं की, साहेब येतील, भावनाप्रधान होऊ नका, भावनेच्या आहारी जाऊ नका, आता कालच्या सभेत काय झालं?, असं म्हणत शरद पवारांनी अजितदादांनी नक्कल केली. म्हणाले, हा प्रश्न तत्व आणि विचारांचा आहे.", असे म्हणत त्यांनी विचारधारेचा उल्लेख केला मात्र, छत्रपती शिवरायांचे नाव घेण्यास पवार विसरले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही नाही!
पक्ष, सत्ता आणि सर्वकाही हातून गेल्यानंतर ४० वर्षांनी रायगडावर तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यासाठी जाणाऱ्या शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या प्रचारसभेत छत्रपतींचा उल्लेखही केला नाही. एका विशिष्ट समाजासाठी लांगूलचालन करण्यासाठी शरद पवार कायम छत्रपतींचे नाव घेणे टाळतात का?, असा सवालही शिवप्रेमींकडून विचारला जात आहे.
नुसती तुतारी नको!
पिपाणी आणि तुतारीच्या घोषणेबद्दलही शरद पवारांनी घोळ पवारांनी आखून दिला. नुसती पिपाणी नको, तर तुतारी वाजविणारा माणूस हा शब्द त्यांच्या डोक्यात बसवा, मागच्या वेळेला लाखो मतं त्यामुळे वाया गेली, यंदा ते करू नका, असे आवाहन शरद पवारांनी केलं.
नम्रतेने निवडणूक जिंका
कुणीही कितीही घोषणा दिल्या, कुणावरही व्यक्तिगत टीका नको, विरोधक वडिलधारी असतील त्यांचाही सन्मान ठेवायचा आहे. संयमाने निवडणूक कशी लढवली जायची असेल, तर ती बारामतीत जाऊन पहा, असे लोकांनी सांगितले पाहिजे, असेही पवार म्हणाले.