स्त्री भ्रूण हत्येवर आधारित ‘सॅटरडे नाईट’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ

29 Oct 2024 16:46:20

movie  
 
मुंबई : ‘सॅटरडे नाईट’ हा स्त्री भ्रूण हत्येवर आधारित थ्रिलर चित्रपट असून प्रेक्षकांना एक वेगळा थरार यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. ‘सॅटरडे नाईट’ विषयी बोलताना दिग्दर्शक विलास वाघमोडे म्हणतात, “हा चित्रपट फक्त गुन्हेगारी तपासावर आधारित नाही, तर मानवी स्वभावाच्या गूढ कोपऱ्यांवर प्रकाश टाकतो. स्त्री भ्रूण हत्येवर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल. ही कथा जरी काल्पनिक असली तरी त्यात वास्तवाचा अंश आहे, जो प्रेक्षकांना त्यांच्याशी जोडेल.”
 
अध्यांश मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘सॅटरडे नाईट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू - गंगावणे दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रणाली उन्मेश वाघमोडे आणि उन्मेश विलास वाघमोडे निर्माते आहेत. या थरारक चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले आणि जितेंद्र पोळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
अनुप्रिता कडू गंगावणे म्हणतात, “सस्पेन्स आणि थ्रिलर हा असा जॉनर आहे, जो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेमाला एका वेगळया उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहोत'.'
 
 
Powered By Sangraha 9.0