एका बापाची मन हेलावणारी गोष्ट! नाना पाटेकरांच्या 'वनवास'चा हृदयस्पर्शी टीझर प्रदर्शित

29 Oct 2024 15:47:07

vanvaas 
 
 
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आगामी 'वनवास' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता संपली असून चित्रपटाचा टीझर भेटीला आहे. 'अपने ही देते है अपनो को वनवास' अशा टॅगलाईनखाली असणाऱ्या 'वनवास' चा टीझर आला आहे.
 
'वनवास' च्या टीझरमध्ये सुरुवातीला बनारसचा घाट आणि नंतर हिमालयाचा बर्फाच्छादित प्रदेश दिसतो. तिथे नाना पाटेकर त्यांच्या मुलाच्या नावाने हाका मारत असलेल्या पाहायला मिळतात. ते बनारसच्या गल्लीबोळात त्यांच्या मुलाचा शोध घेताना दिसतो. शेवटी नाना पाटेकर यांच्या फोटोला हार पाहायला मिळतो आणि त्यांच्यासाठी शोकसभा भरवली जाते. जीवंत असूनही लोक नाना पाटेकरांनी जगाचा निरोप घेतला असं दिसतं.
 
'गदर' आणि 'गदर २' या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. २० डिसेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. नाना पाटेकरांचा 'वनवास' बघायला सर्वांना उत्सुकता असेल यात शंका नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0