विमान, रेल्वे स्टेशनच्या धमक्या देणारा गोंदियाचा रहिवासी; पंतप्रधान मोदींना भेटण्याची मागणी!

29 Oct 2024 16:14:48
maharashtra-author-behind-fake-threat-calls


मुंबई :
       मागील काही काळापासून देशात धमकीचे कॉल आणि ईमेलच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. या धमक्यांच्या मदतीने विमाने आणि महत्त्वाची ठिकाणे बॉम्बने उडविण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. दरम्यान, आता या सर्व अफवा असल्याचे सिध्द झाले आहे. राज्यातील विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील जगदीश उईके या ३५ वर्षीय व्यक्तीचा या धमकी संदेशामागे हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.




दरम्यान, जगदीश उईके दहशतवादी कथांचा लेखक असल्याचेही समोर आले आहे. जगदीश उईकेला याआधी २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. विमान कंपन्या, रेल्वे स्टेशनसह ३० ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा ई-मेलही केला होता. याठिकाणी स्फोटाचं टूलकिट असल्याचा दावादेखील त्याने केल्याचे समोर आले. आता रेल्वे स्टेशन, विमान कंपन्या यांना धमक्या देणारा गोंदिया येथील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे.

जगदीश उईके याने पंतप्रधान मोदींना भेटण्याचा प्रयत्न केला असून त्याला शोधाची माहिती देऊ शकेल. आपल्याकडे दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित काही खास माहिती असल्याचा दावा उईके याने केला. या प्रकारानंतर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून विमान कंपन्या आणि दहशतवादविरोधी पथकेही सतर्क झाली आहेत. जगदीश उईकेने दहशतवादावर एक पुस्तकही लिहिल्याचे समोर आले आहे.



 
Powered By Sangraha 9.0