३० ऑक्टोबर की १ नोव्हेंबर ? कधी आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त?

29 Oct 2024 19:40:44
 
lakshmipujan
 
दिवाळी या सणातील लक्ष्मीपूजन हा एक महत्वाचा मानला जाणारा दिवस. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीसोबतच घरातील मौल्यवान वस्तूंना लक्ष्मीचे प्रतीक मानून त्यांचीही पूजा केली जाते. झाडूलाही लक्ष्मीचे रूप मानले जात असल्यामुले तिचेही या दिवशी पूजन केले जाते. दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण या वर्षी या दिवसाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. लक्ष्मीपूजन ३१ ऑक्टोबरला करावे की १ नोंव्हेबरला करावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लक्ष्मीपूजन हे दरवर्षी प्रदोश काळात केले जाते. या वर्षी प्रदोश अमावस्या ही ३१ ऑक्टोबरला दुपारी 3 वाजून ५२ मिनिटांनी सुरु होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी संपणार आहे. दोन्ही दिवशी अर्धा अर्धा दिवस ही अमावस्या असल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. पण आपल्या संस्कृतीत कोणताही सण हा तिथीनुसार साजरा केला जातो. आपल्याकडे तिथीला खूप महत्व असते. त्यामुळे उदय तिथी १ नोंव्हेबर रोजी आल्यामुळे लक्ष्मीपूजन हे १ नोंव्हेबरलाच करावे असा सल्ला अनेक ज्योतिषी आणि पंचागकर्त्यांनी दिला आहे. “दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुस-या दिवशी प्रदोषकालात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात सांगितले आहे. म्हणून लक्ष्मीपूजन शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी करावे. १ नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळात म्हणजे सायंकाळी ६ वाजून 4 मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंतच्या कालावधीत या वर्षी लक्ष्मी-कुबेरपूजन करावे. १९६२, १९६३ आणि २०१३ मध्येही दोन दिवस प्रदोषकालात आश्विन अमावास्या आली होती. त्यावेळीही दुस-या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले होते” अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. 
Powered By Sangraha 9.0