बोरिवलीचा कौल महायुती सरकारलाच!

29 Oct 2024 21:54:13
borivali election mahayuti govt


मुंबई :  
    "लोकसभेला बोरिवली मतदारसंघ महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला, आता विधानसभेलाही मतदार महायुतीला कौल देतील आणि राज्यात महायुतीचीच आणायला मदत करतील" असा विश्वास भाजपचे मुंबई सरचिटणीस तथा बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी व्यक्त केला.

मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी उपाध्याय यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला. महायुतीकडून यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आमदार सुनील राणे यांच्या कार्यालयाजवळून उपाध्याय यांच्या नामांकन रॅलीला सुरुवात झाली. हजारो कार्यकर्ते त्यात सहभागी झाले. स्वामी विवेकनांदांच्या स्मृतीशिल्पाला पुष्पहार अर्पण करून उपाध्याय उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले.

यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार पीयूष जी गोयल, आ. मनीषा चौधरी, आ. अतुल भातखळकर, आ. योगेश सागर, आ. प्रकाश सुर्वे यांच्यासह जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते. युवा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील उपाध्याय यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सायंकाळी बोरिवली पश्चिम येथील मधुरम हॉलमध्ये विशाल कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने धनत्रयोदशीचा उत्सव साजरा करत संजय उपाध्याय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

Powered By Sangraha 9.0