डोंबिवली : मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. चव्हाण यांच्या डोंबिवली पश्चिमेतील जनसंपर्क कार्यालयापासून रॅली काढण्यात आली होती. भव्य शक्तीप्रदर्शन करत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोलताशा आणि लेझीमच्या गजरात चव्हाण यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. दीनदयाल रोडवरून रॅली स्टेशन परिसरात आली. भाजपाच्या माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनिषा धात्रक यांनी रॅलीचे पुष्पवृष्टीने स्वागत केले. आतिषबाजी ही केली. तसेच मंत्री रविंद्र चव्हाण पुन्हा एकदा जिंकून येतील आणि शैलेश धात्रक यांनी व्यक्त केला. या रॅलीत भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना ) सूर्यवंशी, शशिकांत कांबळे, मनिषा राणे, मंदार हळबे, समीर चिटणीस, शिंदे गटाचे राजेश मोरे आदी पदाधिकारी आणि कार्यक र्ते उपस्थित होते. महायुतीतील सर्वच घटकपक्ष यावेळी उपस्थित होते. भाजपाचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सादर केला.
रविंद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून या परिसरात अनेक विकास कामे केली आहेत. पक्षश्रेष्ठींनी चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. हा मतदार संघ महायुतीचा बालेकि ल्ला आहे. कार्यकर्ते मोठय़ा संख्यने अर्ज भरण्यासाठी आले आहे. त्यामुळे महायुतीचा विजय होईल. सामान्य जनता ही शंभर टक्के महायुतीसोबत आहे. त्यामुळे महायुतीचा विजय हा शंभर टक्के होणार आहे.