मुंबई : प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये भरले आहे. सोमवार ४ नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे. ४ नोव्हेंबेर पर्यंत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
संजय शेलार हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांनी कोल्हापूरमधील कलानिकेतन महाविद्यालयातून कलेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम चित्रे काढली आहेत आणि त्या चित्रांची अनेक ठिकाणी प्रदर्शने ही भरली आहेत. त्यांनी काढलेल्या चित्रांसाठी त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे.