अजितदादांच्या आरोपानंतर रोहित पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...

    29-Oct-2024
Total Views |

Rohit Patil


मुंबई :
अजितदादांच्या आरोपामुळे आमच्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना खूप वाईट वाटले आहे. आज आबा असते तर त्यांनी नक्कीच त्यांना उत्तर दिले असते, अशी प्रतिक्रिया आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात आर. आर. पाटलांवर जाहीर सभेत आरोप केले होते.
 
यासंदर्भात बोलताना रोहित पाटील म्हणाले की, "आबांना जाऊन आता नऊ वर्षे झाले आहेत. आज आबा असते तर त्यांनी या आरोपाचे उत्तर दिले असते. परंतू, आता त्यांच्या पश्चात दादांनी हे वक्तव्य का केलं, हे कळत नाही. अजितदादा वरिष्ठ आहेत. आम्ही दादांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर काही बोलणार नाही. परंतू, या वक्तव्यामुळे आमच्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना खूप वाईट वाटले आहे."
 
हे वाचलंत का? - भव्य शक्तीप्रदर्शन करत पराग शाह यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज!
 
अजित पवारांचे आरोप काय?
 
माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्याची एक फाईल तयार झाली. ती फाईल गृहखात्याकडे जाते. आर. आर. आबा पाटलांनी अजित पवारांची खुली चौकशी व्हावी, यासाठी त्या फाईलवर सही केली. त्यांनी आपला केसाने गळा कापला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला होता.