मुंबई : मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वोट जिहाद आणि आतंकवादाच्या समर्थकांचा पराभव होणार, असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला. मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याठिकाणी शिवसेनेचे सुरेश पाटील आणि समाजवादी पक्षाचे अबु आझमी हे रिंगणात आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, "मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात शिवसेनेचे सुरेश पाटील हे महायूतीचे अधिकृत उमेदवार आहेत. याठिकाणी वोट जिहादचे समर्थक अबु आझमी आणि आतंकवादाचे समर्थक नवाब मलिक यांचा पराभव करून सुरेश पाटील विजयी होणार आहेत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.