दारुच्या बाटल्या, कचरा आणि घाण; दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची गलिच्छ अवस्था

29 Oct 2024 17:49:49

diljit  
 
 
दिल्ली : जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये गायक दिलजीत दोसांझ याचा दोन दिवसीय कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. कॉन्सर्ट झाल्यानंतर स्टेडियमची अवस्था उपस्थित लोकांनी गलिच्छ केली असून तिथेच दारुच्या बाटल्या, कचरा आणि प्रचंड घाण केली आहे. इतकेच नव्हे तर तेथे अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या अॅथलेट्सच्या सामानांची देखील मोडतोड करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन दिवसी कॉन्सर्टसाठी ७० हजारांपेक्षा जास्त लोकं तेथे हजर होते.
 
जवाहरलाल नेहरु मैदानाच्या आत फुटबॉलचे मैदान आहे. तसेच, येथे आयएसएलची मॅच गुरुवारपासून सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण मैदानाची झालेली दुरावस्था खेळाडूंसाठी अयोग्य आहे. सोशल मिडियावर दुरावस्थेत असणाऱ्या या स्टेडियमचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. अॅथलेट बेअंत सिंह यांनी सोशल मिडियावर दयनीय अवस्थेतील स्टेडियमचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात दिसते की, जिथे अॅथलेट प्रशिक्षण घेतात तेथे लोकांनी दारुच्या बाटल्या फेकल्या आहेत.
 
 
 
तसेच, अॅथलिट्सनी आपल्या पैशांनी खरेदी केलेली उपकरणे देखील उपस्थित लोकांनी तोडली आहेत. या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणारे अनेक अॅथलिट्स प्रशिक्षण घेतात. मात्र, सध्या दुरावस्थेत असलेल्या या स्टेडियमवर एकाही अॅथलेटला प्रशिक्षण घेता येत नसल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी आहे.
Powered By Sangraha 9.0