मुंबई : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी सिंघम अगेन चित्रपटाची टीम उपस्थित होती. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण आणि अगेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता अखेर अर्जुननेच ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे.
अर्जुन कपूर ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनसाठी दादर शिवाजी पार्कच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता. यावेळी त्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहे. ‘फिल्मीज्ञान’ने शेअर केलेल्या या व्हिडीओत अर्जुनच्या शेजारी मनसे प्रमुख राज ठाकरे उभे दिसत आहेत. याचठिकाणी बोलताना अर्जुनने त्याच्या व मलायकाच्या ब्रेकअपची पुष्टी केली.
अर्जुनने हातात माईक घेताच गर्दीतून लोक मलायकाचं नाव ऐकू आलं. ते ऐकून अर्जुन म्हणाला ‘मी सिंगल आहे’. त्यानंतर तो म्हणाला, “माझी ओळख ‘टॉल व हँडसम’ अशी ओळख करून दिली त्यामुळे वाटलं की लग्नाबाबत बोलणार आहेत, त्यामुळे मी असं म्हटलं.” अर्जुनने उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
‘सिंघम अगेन’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत अर्जून कपूर दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, दयानंद शेट्टी हे कलाकार आहेत. हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.