अखनूरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

29 Oct 2024 16:52:55
 
akhnoor
 
( Image Source : ANI )
 
नवी दिल्ली : ( Akhnoor Operation ) जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये मंगळवारी दि.२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
 
अखनूरमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. जम्मू विभागातील अखनूर सेक्टरमधील एका गावात मंगळवारी सकाळीही चकमक सुरू होती. यावेळी सुरक्षा दलांनी या भागात लपलेल्या दोन दहशतवाद्यांवर अंतिम हल्ला चढवला. सोमवारी सकाळी नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) जाणाऱ्या ताफ्याचा भाग असलेल्या लष्कराच्या रुग्णवाहिकेवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. विशेष दल आणि एनएसजी कमांडोंनी सुरू केलेल्या कारवाईत संध्याकाळी एक दहशतवादी मारला गेला होता.
 
खौरमधील जोगवान गावातील असन मंदिराजवळ दहशतवादी लपून बसले होते. मंगळवारी सकाळी दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर जोरदार गोळीबार झाला. ऑपरेशन दरम्यान गोळी लागल्याने फँटम या चार वर्षांच्या लष्करी श्वानाचा मृत्यू झाला.
 
Powered By Sangraha 9.0