मुंबई : वारी एनर्जीजचे समभाग कंपनी सुचीबध्द होत असताना गडगडल्याचे पाहायला मिळाले. कंपनी लिस्ट होण्याआधीच ग्रे मार्कट अर्थात जीएमपीमध्ये २३ टक्क्यांची घट दिसून आली. त्याचबरोबर, ग्रे मार्केटमध्ये होत असलेले बदल आणि सध्याची परिस्थिती विचारात घेता बाजार तज्ज्ञांकडून भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड धाकधुकीचे वातावरण होते.
आज वारी एनर्जीज समभाग सूचीबध्द होताना मोठी घसरण झाली. त्यामुळे समभाग खरेदी, विक्री किंवा होल्ड करावे का, असे प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावताना दिसून येत आहे. बाजारात शेअर्स सूचीबध्द झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करत असून काही तज्ज्ञांकडून नफा घेण्याचा सल्ला दिला जात आहे. एकंदरीत, कंपनीची आर्थिक स्थिती, चांगली ब्रँड ओळख आणि अनुकूल उद्योग परिस्थिती तिच्या अनुकूल असल्यामुळे दीर्घ मुदतीसाठी समभाग होल्ड करण्याची शिफारस केली जाते.
वारी एनर्जीचे शेअर्स खरेदी करण्याची शक्यता नाकारली कारण सध्याच्या शेअरच्या किमती खूप जास्त वाटत आहेत, असे मत बाजार विश्लेषक अमरीश बालिगा यांनी म्हटले. तसेच, गुंतवणूकदारांनी एकूण नफ्यातील ५० टक्के भाग काढून घेण्याचा सल्ला दिला. सध्याची बाजार पातळी फार काळ टिकणार नाही, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तथापि, भविष्यात समभाग २,०००-२,२०० वर घसरले तर खरेदीचा विचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे, हेम सिक्युरिटीजच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक आस्था जैन यांनीही अर्धवट नफा बुक करण्याचा आणि उर्वरित समभाग दीर्घकाळासाठी ठेवण्याचा सल्ला दिला. कारण कंपनीचे मूलभूत तत्त्वे भक्कम असून अनुकूल उद्योग परिस्थिती साथ देत आहे. ज्या गुंतवणूकदारांना समभाग विकत घ्यायचा आहे ते २,१०० - २,१५० प्रति शेअर खरेदी करू शकतात, असे जैन म्हणाल्या.