निवडणुकीची 'सोय'रिक - शिवसेना शिंदे गटात दिग्गजांचा प्रवेश

    28-Oct-2024
Total Views |
shivsena shinde gut


ठाणे :   
 विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगीनघाई सुरू असताना अनेकजण निवडणुक लढवण्यासाठी 'सोय'रिक करीत आहेत. शिवसेनेत (शिंदे गट) तर इनकमिंग जोरात आहे. पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी तसेच बोईसर येथील विलास तरे यांनी रविवारी रात्री ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेतला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या काही जवळच्या साथीदारांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे हेदेखील उपस्थित होते.