मीरा भाईंदरचे त्रांगडे - दिग्गजांचे अर्ज दाखल, महायुती, मविआ, मनसे, अपक्ष मैदानात

28 Oct 2024 22:10:01
mira bhayander seats elelction
 
 
ठाणे/भाईंदर :    मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत असून सोमवारी भाजपा,काँग्रेस, मनसे, अपक्ष यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. फुलांच्या वर्षावात ढोल ताशांच्या गजराने शहर दुमदुमून गेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात एक विद्यमान आमदार, दोन माजी आमदार, एक माजी उपनगराध्यक्ष यांच्यासह अनेक अपक्षांचा समावेश आहे.
 
मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातून महायुती, मविआ, मनसे अशा प्रमुख पक्षासह काही इतर पक्ष तसेच अनेक अपक्ष यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात प्रामुख्याने भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, मविआमधुन काँग्रेसचे माजी आमदार मुज्जफर हुसैन, मनसेचे संदिप राणे तसेच अपक्ष आमदार गीता जैन, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम या उमेदवारांनी मोठमोठ्या रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीमधून लढण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार गीता जैन दोघेही इच्छुक असून सोमवारी दोघांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या सर्वच उमेदवारांनी विजयाची खात्री व्यक्त केली आहे.





Powered By Sangraha 9.0