मुंबई : भारतातील डायरेक्ट-टू-होम(डीटीएच) उद्योगाच्या महसूल घटू लागला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्राहक डिजिटल सामग्री पर्यायांना अधिक पसंती देताना दिसून येत आहे. देशातल्या चार प्रमुख डीटीएच ऑपरेटर्सचा एकत्रित महसूल ११ हजार कोटींनी घसरला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १२,२८४ कोटी रुपये इतका महसूल होता त्यानंतर २०२३ मध्ये ११,०७२ कोटी रुपयांवर घसरला आहे.
दरम्यान, आता ग्राहक डीटीएच सोडून डिजिटल कंटेंट म्हणजेच ओटीटीला प्राधान्य देत आहेत ही वस्तुस्थिती बळकट झाली आहे, असे डेलॉइट इंडिया भागीदार(मीडिया) चंद्रशेखर मंथा यांनी सांगितले. सध्याच्या ट्रेंडच्या आधारे, क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सचे संचालक (संशोधन), पुशन शर्मा, डीटीएच ऑपरेटर्स आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्ममधील महसुलातील तूट पुढील दोन ते तीन वर्षांत आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परिणामी, ओटीटीच्या प्रभावामुळे डीटीएचची कमाई कमी झाली असून महसूल घटल्याने फायबर सेवा आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. त्याचबरोबर, ग्राहक डीटीएच सेवेपासून दूर गेलेले नाहीत. लोक अजूनही डीटीएच सेवा घेत आहेत परंतु दर्शकांची संख्या आणि तासांची संख्या कमी झाली आहे, असेही सांगण्यात येत आहे. पूर्वी लोक प्रामुख्याने डीटीएच सेवांद्वारे टीव्ही पाहत असत. जागतिक महामारी कोविड-१९ च्या आधी हायब्रीड मॉडेलकडे बदल झाला, असे डिश टीव्हीचे कार्यकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज डोवाल यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले.