मुंबई : सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंन्ड आला आहे. १९९५ साली प्रदर्शित झालेला सलमान खान आणि शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट करण अर्जून पुन्हा एकदा चित्रपटगृहात येणार असून स्वत: सलमान खानने प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. ‘
करन-अर्जुन’ ३० वर्षांनी पुन्हा येणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये ‘तुझे मेरी कसम’, ‘रहना हैं तेरे दिल मैं’, ‘जब वी मेट’ असे अनेक चित्रपट रि-रिलीज करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता ३० वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेला ‘करन अर्जुन’ चित्रपट देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानने याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
सलमानने पोस्ट करत लिहिले आहे की, “राखीजी चित्रपटात अगदी बरोबर म्हणाल्या होत्या…मेरे ‘करन अर्जुन’ आएंगे! २२ नोव्हेंबरला आम्ही पुन्हा एकदा जगभरातील सिनेमागृहांमध्ये येतोय” या चित्रपटात सलमान-शाहरुखसह काजोल, ममता कुलकर्णी, राखी गुलजार, अमरिश पुरी, इला अरुण, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.