मुंबई : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हिंदीतील दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. भूल भुलैय्या ३ आणि सिंघम अगेन या दोन चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार आहे. अजय देवगण आणि कार्तिक आर्यन १ नोव्हेंबर २०२४ रोजी बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे यापूर्वीचे प्रत्येक भाग यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आता नेमक्या कोणच्या चित्रपटाकडे प्रेक्षक वळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांसाठी प्री-बुकिंग जोरदार सुरु झाले असून काही अंशी वाद देखील सुरु आहे.
दरम्यान जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी निर्माते आपापल्या चित्रपटांसाठी स्क्रीन खरेदी करत असतात. या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आता केवळ एक आठवडा शिल्लक राहिला असून आता आगाऊ बुकिंग बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, भूल भुलैय्या 3 आणि सिंघम अगेनचे आगाऊ बुकिंग थांबवण्यात आले आहे. दोन चित्रपटांच्या स्क्रीन वाटपाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत कोणीही तिकीट काढू शकणार नाही.
इंडिया.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, कॉम्प्लेक्सचे चित्रपट व्यवस्थापक कुमार अभिषेक यांनी या चित्रपटांमधील स्क्रीनबाबत अजूनही वाद सुरु आहेत. दोघेही मागे हटायला तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत स्क्रीन वाटपाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तिकीटविक्री ठप्प राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंघम अगेनने विशेषत: UAE मार्केटमध्ये भुल भूलैय्या ३ ला मागे टाकल्याचं सांगण्यात येत आहे. क्रॉप ड्रामाने याआधीच VOX सिनेमाजमध्ये ६४ शो लावत ६६ लाख रुपये कमावले आहेत. तर भुल भूलैय्या ३ च्या तुलनेत सिंघम अगेन आघाडीवर असल्याचं समजत आहे.