जम्मू-काशमीर : भारतीय लष्करांच्या रुग्णवाहिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची घटना जम्मू-काशमीरच्या अखनूर येथे घडली. सोशल मीडियावर तीन दहशतवाद्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास झालेल्या हल्ल्यानंतर लष्कराने घटनास्थळाला वेढा घालत कारवाईला सुरुवात केली.
दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांच्या तपासावेळी काही शस्त्रे, दारुगोळा जप्त केला आहे. तसेच लष्करांची कारवाई अद्यापही सुरु आहे. तसेच जम्मू-काश्मीर येथील अखनूर विभागात दहशतवाद्यांचे वाहन भटाल भागातील शिव मंदिराजवळून जात असताना त्यांना लक्ष्य केले गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी रुग्णवाहिकेवर गोळीबार केला.
दरम्यान, सध्या जम्मू-काश्मीर येथे उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री आहेत. उमर अब्दुल्लांचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर येथे दहशतवादाचे सावट निर्माण झाले आहे. काही दिवसांआधी दहशतवाद्यांनी लष्करांच्या गाडीवर हल्ला केला होता. यामध्ये काहीजण ठार झाले होते. तसेच काही दिवसांआधी बिहारचा एक युवक जम्मू येथे रोजगारासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यावर हल्ला करत त्याला ठार मारण्यात आले होते.