मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. याशिवाय अभिषेक बच्चन अभिनेत्री निम्रत कौर हिला डेट करत असल्याच्या बातम्याची जोर धरु लागल्या आहेत. यावर आता निम्रतने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत निमरत कौर म्हणाली, “मी काहीही केलं तरी लोक त्यांना हवं तेच बोलणार. अशा गॉसिप्स थांबणार नाहीत. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणं पसंत करते.” आयुष्यातील तथ्यहीन गोष्टींना फार महत्त्व देत नसल्याचं निमरत म्हणाली.
दरम्यान, अभिषेक बच्चन आणि निमरत कौर यांनी एकत्र ‘दसवीं’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या आणि निमरतमुळे ऐश्वर्या व अभिषेकचा घटस्फोट झाला असं म्हटलं जाऊ लागलं.
याशिवाय अलीकडच्या काळात अभिषेक आणि ऐश्वर्या कोणत्याच कार्यक्रमांना एकत्र आलेले दिसले नाही, अगदी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नातबी अभिषेक बच्चन कुटुंबाबरोबर आला होता. तर ऐश्वर्या मुलगी आराध्याला घेऊन वेगळी आली होती. एकाच ठिकाणी या दोघी मायलेकी व संपूर्ण बच्चन कुटुंब वेगवेगळे आल्याने अभिषेक व ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. मात्र, अभिषेक व ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबापैकी कोणीही अद्याप या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.