मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kerala Waqf Board News) वक्फ बोर्डाने केरळच्या मुनंबममधून मच्छीमारांना बाहेर काढण्याची योजना आखली असून वक्फ बोर्डाच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू झाली आहेत. येथील वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.के. झाकीर यांच्यामते वक्फ बोर्डाने जमिनीवर हक्क सांगण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे जाण्याच्या उद्देशाने मुनंबममधील मच्छिमारांना जमीन परत मिळवून देण्याची योजना जाहीर केली आहे. बोर्डाने नुकतीच वक्फ मालमत्तेवर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेतली आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व जमिनी सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला.
हे वाचलंत का? : तेलंगणा येथील ७५० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा
महसूल विभागाच्या मालकीच्या कागदपत्रांशिवाय, अनेक स्थानिक कुटुंबांना अडचणींचा सामना सध्या करावा लागतो आहे. वक्फच्या अशा कारवाईमुळे स्वतःची जमीन त्यांना गहाण ठेवता येत नाही. मच्छिमारांना देखील कठीण परिस्थितीत संघर्ष करावा लागतो, त्यांची दुरावस्था झालेली घरे पुन्हा बांधता न आल्याने ते ताडपत्रीखाली राहत आहेत. बोटींच्या देखभालीसाठी सुद्धा संसाधनांची कमतरता असते, ज्यामुळे त्यांची उपजीविका धोक्यात येते. आधीच संकटात असलेल्या या असुरक्षित लोकांसाठी वक्फच्या निर्णयाकडे एक आव्हान म्हणून पाहिले जाते.
वक्फ बोर्डाचा मुनांबममधील जमिनीवर पुन्हा दावा करण्याचा दृष्टिकोन धोरणात्मक आहे, या प्रयत्नात पूर्वीच्या बोर्ड सदस्यांचा समावेश आहे. वक्फ जमीन संरक्षण समिती नावाचा एक गट स्थापन करण्यात आला असून, मुनंबम जमीन वक्फच्या मालकीची असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. हळूहळू वक्फ बोर्डही या प्रकरणात पक्षकार म्हणून सामील झाले. मुनंबममधील ४४० एकरांवर वक्फचा हक्क आहे, जरी सागरी अतिक्रमणानंतर, फक्त ११० एकर जागा शिल्लक आहे, जिथे सध्या ६१० कुटुंबं राहतात, ज्यांना आता निष्कासनाचा धोका आहे.