'IIT Bombay'मध्ये महमूद फारुकींना दणका!

28 Oct 2024 13:51:46

IIT Bombay Mahmood Farooqui

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (IIT Bombay Mahmood Farooqui)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने अर्थात आयआयटी बॉम्बेने चित्रपट दिग्दर्शक महमूद फारुकी यांना दिवाळीनिमित्त 'महाभारत'वर आधारित कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. सदर कार्यक्रम २६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ‘दास्तान-ए-कर्ण-युग महाभारत’ या नावाने आयोजित करण्यात आला होता. त्यास विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला होता.

हे वाचलंत का? : रुस्तम, अकबर आणि बाबू यांचे राम मंदिरात नमाज पठण

वास्तविक महमूद फारुकी यांच्याविरोधात अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अशा बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीने आयआयटीच्या मंचावर सादरीकरण करावे हा आयआयटीचा अपमान असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ‘आयआयटी बी फॉर भारत’ या आयआयटी बॉम्बे येथील विद्यार्थी स्वयंसेवक गटाने या कार्यक्रमावर घेतलेल्या आक्षेपामुळे त्यांना कार्यक्रम रद्द करावा लागला.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “फारूकी यांना आयआयटी बॉम्बेमध्ये आमंत्रित केल्याने संस्थेच्या सुरक्षितता, सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दलच्या वचनबद्धतेवर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांची उपस्थिती अस्वस्थ आणि असुरक्षित वातावरण निर्माण करू शकते." फारुकी हे यापूर्वीसुद्धा वादात सापडले होते. २६/११ च्या हल्ल्यात दोषी ठरलेला मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबच्या दयेच्या अर्जावर त्यांनी स्वाक्षरी केली होती.
Powered By Sangraha 9.0