गोडदेव ग्रामस्थ मंडळ आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा

    28-Oct-2024
Total Views |

Pustak Prakashan Sohla

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Godadev Gramastha Mandal) लोकमत परिष्कार अंतर्गत आणि गोडदेव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी इन्दलोक नगर, गोडदेव गांव, भाईदर पूर्व येथे पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'निर्मल वारी अभियान' व 'एक गठ्ठा मतदानाचा परिणाम' या दोन पुस्तकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला गोडदेव ग्रामस्थांचे प्रमुख वासुदेव पाटील तसेच भरत भालचंन्द्र पाटील व महिला भजन मंडळा तर्फे रेखा म्हात्रे या उपस्थित होत्या. या पुस्तक प्रकाशनासाठी प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर उपस्थित होत्या. गोडदेव ग्रामस्थ प्रमुख मंडळी व महिला मंडळ उपस्थित होते.

Pustak Prakashan Sohla