मुंबई : ( Telangana ) सध्याच्या युगात नोकरीसाठी पारंपारिक शिक्षण बरोबरच कौशल्य विकासाचे महत्त्व खूप आहे. तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना करून या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. MEIL फाउंडेशन, या मेगा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या सामाजिक दायित्वाच्या शाखेअतंर्गत ही योजना कार्यन्वित होत आहे. हैदराबादमध्ये यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटी ( YISU) स्थापन करण्यासाठी २०० कोटी रुपयांचे योगदान MEIL फाउंडेशन देणार आहे. तेलंगणा सरकारच्या भागीदारीत विकसित होणारे हे विद्यापीठ तरुणांसाठी कौशल्य आणि उद्योजकतेचे प्रगत प्रशिक्षणाचे काम करेल.
या सामंजस्य करारावर दि. २६ ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी करण्यात आली. यावेळेस मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि MEIL चे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा रेड्डी उपस्थितीत होते.
हैदराबादच्या जवळ, मीर खान पेटा येथे ५७ एकरच्या विस्तीर्ण जागेवर विद्यापीठाची उभारणी होत आहे. YISU कॅम्पसमधील प्रमुख सुविधांमध्ये शैक्षणिक, प्रशासकीय इमारती, वाचनालय आणि संगणक कार्यशाळा, प्रयोगशाळा, विद्यार्थी आणि प्राध्यापक निवास, गेस्ट हाउस आणि VC, रजिस्ट्रार निवास, ७०० आसनी सभागृह आणि कॉन्फरन्स रूम इत्यादींचा समावेश आहे.