जिओचा दिवाळी-धमाका! ‘जिओभारत’ 4जी फोनच्या किमतीत भरघोस सूट

27 Oct 2024 16:43:01
jio diwali dhamaka jio bharat mobile
 

मुंबई :     यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओने कंपनीने जिओभारत ४जी फोनच्या किमतीत ३० टक्के कपात केली आहे. मर्यादित कालावधी असलेल्या ऑफरमध्ये ९९९ रुपयांचा जिओभारत मोबाइल फोन आता फक्त ६९९ रुपयांच्या विशेष किमतीत उपलब्ध होणार आहे.


हे वाचलंत का? -     भारतात 4G, 5G सेवांमध्ये अजूनही भरपूर संधी; बहुराष्ट्रीय दूरसंचार कंपनीचे सुतोवाच


त्याचप्रमाणे, जिओभारत फोनला १२३ रुपयांमध्ये रिचार्ज करता येणार असून मासिक टॅरिफ प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉल्स १४ जीबी डेटा देखील मिळेल. १२३ रुपये असलेला जिओचा मासिक रिचार्ज प्लॅन इतर ऑपरेटर्सच्या तुलनेत ४० टक्के स्वस्त आहे. सध्या फीचर फोनच्या मासिक रिचार्जसाठी किमान १९९ रुपये आकारतात.

विशेष म्हणजे प्रत्येक रिचार्जवर ७६ रुपये प्रति महिना बचतीसह ९ महिन्यांच्या रिचार्जनंतर जिओभारत फोन ग्राहकांना मोफत मिळणार आहे. दरम्यान, हा फक्त एक फोन नसून 2जी वरून 4जी वर शिफ्ट होण्याची नामी संधी आहे. ४५५ पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स, मूव्ही प्रीमियर आणि नवीन चित्रपट, व्हिडिओ शो, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, जिओसिनेमाचे हायलाइट्स, डिजिटल पेमेंट, QR कोड स्कॅन यासारख्या सुविधा जिओभारत ४जी फोनमध्ये उपलब्ध आहेत.



 
Powered By Sangraha 9.0