भारतात 4G, 5G सेवांमध्ये अजूनही भरपूर संधी; बहुराष्ट्रीय दूरसंचार कंपनीचे सुतोवाच

27 Oct 2024 13:12:23
ericsson-still-has-a-lot-of-opportunities


मुंबई :      भारतात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडवली असून नवनवे बदल होताना दिसून येत आहे. भारतात 4G, 5G सेवांमध्ये अजूनही भरपूर संधी आहेत, असे विधान स्वीडिश बहुराष्ट्रीय नेटवर्किंग आणि दूरसंचार कंपनी एरिक्सन(Ericsson)ने केले आहे. त्याचबरोबर, देशातील अंतिम वापरकर्त्याच्या पातळीवर डेटाचा वापर वाढल्याने त्याच्या वाढीचा पुढचा टप्पा नेटवर्क डेन्सिफिकेशनद्वारे चालविला जाईल, असे दूरसंचार उपकरण निर्माता कंपनी एरिक्सनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.




दरम्यान, भारतात स्थिर वायरलेस प्रवेशामध्ये वाढ होण्याची लक्षणीय क्षमता आहे. तैनातीच्या संख्येच्या दृष्टीने असून लवकरच अमेरिकेतही आकडा पार करेल, असे भारतातील व्यवस्थापकीय संचालक नितीन बन्सल यांनी सांगितले. वाढीचा पुढील टप्पा प्रामुख्याने नेटवर्क वापर वाढवण्यासाठी नेटवर्क डेन्सिफिकेशनद्वारे वाढत्या ‘ट्रैफिक’ गरजा पूर्ण करण्यावर केंद्रित आहे. जसे नेटवर्क वापर वाढीस लागेल तेव्हाच नेटवर्क अधिक फोफावण्याची शक्यता जास्त असते.

भारतात जरी 5G ची मागणी मंदावली असली तरी, 4G आणि 5G सेवांमध्ये अजूनही संधी आहेत. विशेषत: कंपन्या बाजारात आक्रमक दृष्टिकोन वाढवण्याचा विचार करत आहेत, असेही एमडी बन्सल म्हणाले. भारतातील डेटा ट्रॅफिक २९ GB प्रति स्मार्टफोन वापरकर्त्यांवरून २०२९ पर्यंत ६८ GB पर्यंत वाढेल, असा एरिक्सनचा अंदाज आहे.




Powered By Sangraha 9.0