खलिस्तानी दहशतवाद्याचे मृत्युपत्र देण्यास कॅनडाचा नकार

    27-Oct-2024
Total Views |

Khalistan
 
ओटावा : भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरचे मृत्यूपत्र देण्यास नकार देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय एजन्सी एनआयएने कॅनडाकडून निज्जरचे मृत्यूपत्र मागितले. जेणेकरून त्यांच्यावरील खटले न्यायालयात अद्ययावत करता येतील. यावर आता कॅनडाने भारताच्या या विनंतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी भारताला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.
 
भारतीय वंशाचा हरदीप सिंह निज्जर कॅनडाच नागरिक आहे. याची जून २०२३ मध्ये कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या प्रकरणात भारतीय एजन्सीवर या हत्येमागे हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
एनआयएने गुरुपवंत सिंह पन्नूनसारख्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात तपास करण्यात आला आहे. ज्यात त्यांच्या एकूण मालमत्तेची माहिती मिळवत मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमधील राजनैतिक वाद अधिकच तीव्र झाला असल्याची माहिती आहे.