सौर प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी एसबीआयने केली भागीदारी

26 Oct 2024 18:09:38
solex-energy-partners-with-sbi-to-finance
 

मुंबई :   सोलेक्स एनर्जीने आगामी प्रकल्पाकरिता वित्तपुरवठ्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय)सोबत करार केला आहे. सोलेक्स एनर्जीने व्यावसायिक, औद्योगिक आणि संस्थात्मक ग्राहकांना सौर वित्तपुरवठा एसबीआय करणार आहे. विशेष म्हणजे सुर्य शक्ती सोलर फायनान्स योजनेंतर्गत सौर प्रकल्पासाठी एसबीआयकडून १० कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची शक्यता कंपनीला आहे.

 
 
दरम्यान, भारताच्या अक्षय ऊर्जा भविष्यासाठी सौर ऊर्जा सुलभ, परवडणारी आणि प्रेरक शक्ती बनविणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. एसबीआय सोबत भागीदारी सौर ऊर्जेच्या वाढीला गती देईल आणि आमच्या ग्राहकांना सौर उपायांचा अवलंब करण्यास सक्षम करेल, असेही सोलेक्स एनर्जी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चेतन शाह यांनी म्हटले आहे.

सोलेक्स एनर्जी ग्राहकांना साइट मूल्यांकन आणि डिझाइनपासून ते नियामक मंजूरी मिळवण्यापर्यंत एंड-टू-एंड सपोर्ट देईल. दुसरीकडे, एसबीआय एक डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदान करेल, जे सौर प्रकल्पांसाठी त्रासमुक्त कर्ज अर्ज प्रक्रिया सुनिश्चित करेल. विविध सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कर्जदार व्यावसायिक आणि निवासी सौर प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी सौर कंपन्यांसोबत सामील होत आहेत.





Powered By Sangraha 9.0