मराठी भाषा आता ऑक्सफर्ड विद्यापिठात शिकवली जाणार!

26 Oct 2024 13:27:12

oxford 
 
मुंबई : नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी, विकासासाठी, प्रचारासाठी आणि प्रसारासाठी प्रयत्न केले जाणार आहे. पण आता फक्त राज्यात किंवा देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या माय मराठीचा डंका वाजणार आहे. कारण जगातील एका नामांकित विद्यापीठात म्हणजेच ऑक्सफर्ड विद्यापिठात मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील आशियाई आणि मध्यपूर्व अभ्यास विभागाने (युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड फॅकल्टी ऑफ एशियन अँड मिडल ईस्टर्न स्टडीज) मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या अभ्यासक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मराठी शिकण्याची संधी मिळणार आहे.
 
मराठी भाषेच्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीपासून मराठी शिकवले जाणार आहे. देवनागरी लिपी, मराठी मूळाक्षरे, शब्द, वाक्य, वाक्यरचना, वाचन आणि मग लेखन अशा गोष्टी मुलांना शिकविल्या जाणार आहेत.
Powered By Sangraha 9.0