मुंबई : नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अमेरिकन कंपनी एनव्हिडीया यांच्यात करार करण्यात आला. एनव्हिडिया आणि रिलायन्स भारतात कृत्रिम बुध्दिमत्ता(एआय) क्षेत्रात क्रांती घडविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात एआय, 'क्वांटम कंप्युटिंग' आणि 'सेमीकंडक्टर' सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या १५ आघाडीच्या यूएस कंपन्यांचे सीईओ या बैठकीत सहभागी झाले होते. त्यानंतर आता कृत्रिम बुध्दिमत्ता क्षेत्रात भारत नवे युग प्रस्थापित करण्यास सरसावलेले दिसून येत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एनव्हिडीया चे संस्थापक व सीईओ जेन्सेन हुआंग चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तैवान वंशाचे जेन्सेन हुआंग यांनी अमेरिका स्थित विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर LSI लॉजिक येथे CoreWare चे संचालक तर Advanced Micro Devices (AMD) येथे मायक्रोप्रोसेसर डिझायनर म्हणून काम केले. १९९३ साली वयाच्या ३०व्या वर्षी एनव्हिडिया कंपनीची स्थापना केली. सह-संस्थापक ख्रिस मालाचोस्की आणि कर्टिस प्रीम यांच्यासोबत एनव्हिडीयाची स्थापना केली.
जेन्सेन हुआंग यांनी एआय क्षेत्रात क्रांती करण्यासाठी भारतातील बड्या उद्योगसमूहासोबत करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कृत्रिम बुध्दिमत्ता(एआय) क्षेत्रात पाऊल टाकत असून ग्लोबल चिप कंपनी एनव्हीडिया कॉर्पसोबत नवा करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून रिलायन्स एआय कम्प्युटिंग पायाभूत सुविधा व भारतात एक इनोव्हेशन सेंटर निर्माण केले जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे नवीन फ्लॅगशिप डेटा सेंटर एनव्हिडिया ब्लॅकवेल एआय(Nvidia Blackwell AI) चिप्स वापरण्याची शक्यता आहे.
सन १९९० पासून व्हिडीओ गेम प्रोसेसर डिझायनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निव्हिडीयाचे समभाग ऑक्टोबर महिन्यात जवळपास १८ टक्क्यांनी वाढले आहेत. टेक कंपन्यांच्या समभागावर नजर टाकल्यास मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल ३.२० ट्रिलियन डॉलर होते तर समभाग १.३ टक्क्यांनी वाढ नोंदविली. सिलिकॉन व्हॅली चिपमेकर कंपनी एआय कंप्युटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसर प्रमुख पुरवठादार आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, मेटा प्लॅटफॉर्म आणि इतर दिग्गजांच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
एनव्हिडीया कंपनी जगासाठी भारतात सह-विकास, सह-डिझाइन आणि सह-उत्पादन करू शकतात,” प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, Adobe सीईओ शांतनु नारायण, Accenture सीईओ जुली स्वीट यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) स्कूल ऑफ इंजिनीअरिंग आणि एनव्हिडिया सीईओ जेन्सेन हुआंग यांच्यासह शीर्ष यूएस तंत्रज्ञान कंपन्यांच्या सीईओंच्या उपस्थित होते. युनायटेड स्टेट्स, चीन, तैवान यांसह अन्य देशांमध्ये कंपनी कार्यरत आहे.
हुआंगच्या म्हणण्यानुसार, १९९३ मध्ये तीन सह-संस्थापकांना कंपनी कशी सुरू करावी याची कशी कल्पना नव्हती. एनव्हिडिया बांधणे त्यांच्या अपेक्षेपेक्षा दशलक्ष पट कठीण होते त्यांनी कदाचित ते केले नसते. अमेरिकन चिप निर्माता कंपनी निव्हिडीया(Nvidia)ने अॅपलला मागे टाकत जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) चिप्सच्या वाढत्या मागणीमुळे निव्हिडीया कंपनीच्या समभागात देखील वृध्दी दिसून आली आहे. अमेरिकन भांडवली बाजारात विक्रमी स्टॉक रॅलीनंतर निव्हिडीया कंपनीच्या बाजार भांडवलात ३.५३ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढ दिसून आली आहे.
आर्थिक वर्ष २०२० मध्ये Nvidia ने २.७९६ अब्ज ची कमाई नोंदवली होती तर Nvidia च्या शेअर्सचा व्यापार प्रति शेअर ५३१ डॉलर पेक्षा जास्त होता आणि त्याचे बाजार भांडवल जानेवारी २०२१ मध्ये ३२८.७ बिलियन डॉलरपेक्षा जास्त होते. Q3 2024 च्या अखेरीस Nvidia चे मार्केट कॅप २.९८ ट्रिलियन डॉलर इतके आहे. आजमितीस Nvidia च्या उत्पादनांमध्ये ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स, वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेस आणि ऑटोमोटिव्ह हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर समाविष्ट आहेत.
Nvidia वेफर फॅब्रिकेशन, असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंगसह उत्पादनाच्या सर्व टप्प्यांसाठी बाह्य पुरवठादार वापरते. Nvidia अशा प्रकारे बहुतेक गुंतवणूक आणि उत्पादन खर्च आणि चिप उत्पादनाशी संबंधित जोखीम टाळण्यासाठी उत्पादनांच्या उत्पादनात वापरले जाणारे काही घटक आणि सामग्री(उदा. मेमरी आणि सब्सट्रेट्स) थेट खरेदी करते. Nvidia उत्पादन डिझाइन, गुणवत्ता आश्वासन, विपणन आणि ग्राहक समर्थन यावर स्वतःच्या संसाधनांवर कंपनीकडून लक्ष केंद्रित करण्यात येते.