आधी रिलायन्ससोबत करार आता अॅपलसारख्या दिग्गज कंपनीला धोबीपछाड!

26 Oct 2024 13:31:57
nvidia-becomes-worlds-most-valuable-company
 

मुंबई :       अमेरिकन चिप निर्माता कंपनी निव्हिडीया(Nvidia)ने अॅपलला मागे टाकत जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) चिप्सच्या वाढत्या मागणीमुळे निव्हिडीया कंपनीच्या समभागात देखील वृध्दी दिसून आली आहे. अमेरिकन भांडवली बाजारात विक्रमी स्टॉक रॅलीनंतर निव्हिडीया कंपनीच्या बाजार भांडवलात ३.५३ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढ दिसून आली आहे.




दरम्यान, ३.५२ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असणाऱ्या आयफोन निर्माता कंपनी अॅपलला मागे टाकत निव्हिडीया सर्वात मोठी कंपनी बनली आहे. शुक्रवारी बाजारात चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी निव्हिडीयाचे समभाग सुमारे तीन टक्क्यांनी वधारले. तर अॅपलचे शेअर्समध्ये ०.९ टक्क्यांनी वाढ दिसून आली. विशेष म्हणजे जूनमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि ऍपलला मागे टाकण्यापूर्वी निव्हिडीया 'टेक ट्राय' कंपन्यांचे मार्केट कॅप अनेक महिन्यांपासून एकमेकांशी स्पर्धा करत आहे.

सन १९९० पासून व्हिडीओ गेम प्रोसेसर डिझायनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निव्हिडीयाचे समभाग ऑक्टोबर महिन्यात जवळपास १८ टक्क्यांनी वाढले आहेत. टेक कंपन्यांच्या समभागावर नजर टाकल्यास मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल ३.२० ट्रिलियन डॉलर होते तर समभाग १.३ टक्क्यांनी वाढ नोंदविली. सिलिकॉन व्हॅली चिपमेकर कंपनी एआय कंप्युटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसर प्रमुख पुरवठादार आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, मेटा प्लॅटफॉर्म आणि इतर दिग्गजांच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे.


 
Powered By Sangraha 9.0