मुंबई : आयटीआर भरणाऱ्यांसाठी आयकर विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाने कॉर्पोरेट्ससाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. मूल्यांकन वर्ष २०२४-२५ करिता कॉर्पोरेट्सना आयकर रिटर्न भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली असून सुधारित कालावधी दि. १५ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.
दरम्यान, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(सीबीडीटी)ने पूर्व निर्धारित कालावधी दि. ३१ ऑक्टोबरपासून अंतिम मुदत वाढविली. आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत आयटीआर सादर करण्यासाठी १५ नोव्हेंबर नवी मुदत असेल, असे एका परिपत्रकातून स्पष्ट केले आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये सीबीडीटीने टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यासाठी ७ दिवसांनी वाढ केली होती.
विशेष म्हणजे कर लेखापरीक्षण अहवाल, फॉर्म 3CEB आणि फॉर्म 10DA मधील हस्तांतरण किंमत प्रमाणन यासारख्या इतर आयकर फॉर्मवर लागू होणार नाही, याकरिता अंतिम मुदत दि. ३१ ऑक्टोबर २०२४ राहणार आहे, असे नांगिया अँडरसन एलएलपी मुंबईचे कर भागीदार संदीप झुनझुनवाला यांनी सांगितले. वर्ष २०२४-२५ करिता आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याचा सीबीडीटीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.