न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाचा पराभव!

26 Oct 2024 17:26:20
 
 
IndvsNewz
 
पुणे : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IndvsNewz) संघादरम्यान दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने धूळ चारत भारताला आसमान दाखवले आहे. दुसरा कसोटी सामना पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर खेळण्यात आला होता. मात्र होमग्राऊंडवर टीम इंडियाची किंवींविरोधात दाणादाण उडाली.
 
न्यूझीलंडने टीम इंडियाला ३५९ धावांचे लक्ष दिले होते. मात्र टीम इंडियाने केवळ २५५ धावा करत मायभूमीत पराभवाचा सामना केला आहे. सकाळच्या सत्रात ५ बाद १९८ धावांवर खेळत असलेल्या न्यूझीलंडने ५७ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. अशातच आता टीम इंडियाला २-० अशा फरकाने मालिकेत पराभवाला समोरे जावे लागले आहे.
 
मायदेशात सलग १८ मालिका आणि ४ हजार ३३२ दिवसानंतर कसोटी मालिका गमावण्याची वेळ आली. तसेच भारताला २०१२ नंतर घरात कसोटी मालिकेत पराभूत करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ आहे.
 
मिचेल सँटनरने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. सँटनरने दोन्ही डावात मिळून एकूण १३ विकेट्स घेतल्या. सँटेरने दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी करत ५-५ विकेट्स, घेतल्या असून सँटरने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावांत ६ विकेट्स घेतल्या.
 
दरम्यान झालेला सामना हा पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात आला असून खेळपट्टी ही फरकीपटूंसाठी फायदेशीर असल्याचे सांगतले जात आहे. टीम इंडियाच्या वॉशिंग्टन सुंदरनेही ७ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली. त्यामुळे या खेळपट्टीवर अधिक फिरकीपटू गोलंदाजांना संधी देण्यात आली. त्यांनी संधीचे सोने केले.
 
टीम इंडिया संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
 
न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.
 
 
Powered By Sangraha 9.0