लॉरेन्स बिश्नोई प्रकरणात पंजाब पोलीस निलंबित

पंजाब सरकारची मोठी कारवाई

    26-Oct-2024
Total Views |

Lawrence Bishnoi case
 
चंदीगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकींवर झालेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईबाबत न माहिती असलेल्या घटना आता समोर येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई यांने तुरूंगात असताना दिलेल्या मुलाखतीप्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणात दोन उपअधीक्षकांसह एकूण सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या ड्युटीवेळी केलेल्या कामगिरीत केलेला हलगर्जीपणा तपास पथरकाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये गुरशेर सिंग संधू (डीएसपी), समर वनीत (डीएसपी), रीना (सब इन्स्पेक्टर), जगतपाल जंगू, सब इन्स्पेक्टर (एजीटीएफ), शगनजीत सिंग (सब इन्स्पेक्टर), मुखतियार सिंग (एएसआय) आणि ओम प्रकाश (प्रमुख) कॉन्स्टेबल) यांच्या नावाचा समावेश आहे.
 
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नेमकं काय घडलं?
 
लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत ही ३ आणि ४ सप्टेंबर २०२२ च्या मध्यरात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती. पंजाब पोलिसांच्या ताब्यात असताना ही मुलाखत घेण्यात आली होती. याशिवाय राजस्थानच्या मध्यवर्ती कारागृहात आणखी एक मुलाखत घेण्यात आली होती. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पंजाब सरकारने सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता.