मुंबई : प्रसिद्ध गुस्साडी लोकनृत्य कलाकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते कनक राजू यांचे २५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “एक उत्कृष्ट कलाकार आणि सांस्कृतिक प्रतिक श्री कनका राजूजी यांच्या निधनाने दु:ख झाले. गुसाडी नृत्य जपण्यासाठी त्यांनी दिलेले भरीव योगदान पुढील पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. संस्कृती ही तिच्या पारंपरिक रूपात जोपासली जाऊ शकते हे कनका राजू यांनी कामातून दाखवून दिले. ओम शांती.” अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कनक राजू यांचा जन्म तेलंगणा जिल्ह्यातील, असिफाबाद तालुक्यातील मारलावाई गावात झाला. त्यांनी अनेक वर्षे गुस्साडी या नृत्य प्रकाराची साधना केली. २०२१ मध्ये त्यांना त्यांच्या कलेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.