काँग्रेसची दुसरी यादी जाहीर! २३ उमेदवारांना संधी

26 Oct 2024 11:55:24
 
Nana Patole
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने २३ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी रात्री महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अर्ध्या तासाच्या आत दुसरी यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी शनिवारी सकाळी आपली यादी जाहीर केली. याआधी काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता त्यांनी २३ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तसेच लवकरच तिसरी यादी येणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
 
काँग्रेसने जाहीर केलेली यादी पुढीलप्रमाणे :
 
१) भुसावळ - राजेश मानवतकर 
२) जळगाव-जामोद - स्वाती वाकेकर
३) अकोट - महेश गंगाने
४) वर्धा - शेखर शेंडे
५) सावनेर - अनुजा केदार
६) नागपूर दक्षिण - गिरीष पांडव
७) कामठी - सुरेश भोयर
८) भंडारा - पूजा ठवकर
९) अर्जूनी मोरगाव - दिलीप बन्सोड
१०) आमगाव - राजकुमार पुरम
११) राळेगाव - वसंत पुरके
१२) यवतमाळ - बाळासाहेब मांगुळकर
१३) आर्णी - जितेंद्र मोघे
१४) उमरखेड - साहेबराव कांबळे
१५) जालना - कैलास गोरंट्याल
१६) औरंगाबाद पूर्व - मधुकर देशमुख
१७) वसई - विजय पाटील
१८) कांदिवली पूर्व - काळू बढेलिया
१९) चारकोप - यशवंत सिंग
२०) सायन कोळीवाडा - गणेश यादव
२१) श्रीरामपूर - हेमंत ओगळे
२२) निलंगा - अभयकुमार साळुंखे
२३) शिरोळ - गणपतराव पाटील
 
 
 
Powered By Sangraha 9.0