फटाके फोडणाऱ्या हिंदू व्यक्तीवर कट्टरपंथींचा हल्ला

    26-Oct-2024
Total Views |

Attack on Hindu for bursting crackers

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Attack on Hindu for bursting crackers)
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची बातमी ताजी असतानाच राजस्थानच्या भिलवाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळी येऊ घातली असतानाच फटाके फोडणाऱ्या एका हिंदू व्यक्तीवर काही कट्टरपंथींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे.

हे वाचलंत का? : कर्नाटकात शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर वक्फचा दावा

हल्लेखोर हे एका विशिष्ट समुदायाशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी फटाके फोडणाऱ्या हिंदू व्यक्तीवर हल्ला केला असून त्यानंतर गाडी पेटवली आणि दगडफेक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट समुदायातील काही कट्टरपंथींनी फटाके फोडण्यास आक्षेप घेतल्याने दोन गटांत हाणामारी झाली. या आक्षेपाचे लवकरच जोरदार वादावादीमध्ये रूपांतर झाले. पोलिसांनी सांगितले की याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून ३१ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.