ग्वाल्हेर येथे संघाचा 'अखिल भारतीय विविध संघठन प्रचारक वर्ग'

26 Oct 2024 16:48:21

RSS

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vividh Sangathan Pracharak Baithak) 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रचारक बांधवांचा वर्ग दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या काळात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त होणाऱ्या या अखिल भारतीय विविध संघठन प्रचारक वर्गात देशभरातील ३१ विविध संघटनांचे एकूण ५५४ प्रचारक सहभागी होणार आहेत. या वर्गाचे स्वरूप शैक्षणिक असेल.
 
हे वाचलंत का? : जगाच्या विकासासाठी हिंदू एकता महत्त्वाची : दत्तात्रेय होसबळे
 
दर चार ते पाच वर्षांनी अखिल भारतीय स्तरावर हा वर्ग आयोजित केला जातो. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह सर्व सहा सह-सरकार्यवाह आणि इतर प्रमुख अधिकारी वर्गात सहभागी होतील. वर्गात अपेक्षित असलेले सर्व कार्यकर्ते समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात राष्ट्रवादाच्या भावनेने समाजाच्या हितासाठी सक्रिय असतात. या वर्गात मजूर, शेतकरी, विद्यार्थी तसेच सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि ग्रामीण, वनवासी आणि शहरी भागातील कार्याबाबत चर्चा होईल.
 
या वर्गात व्यक्तिगत कुशलक्षेम, व्यक्तिगत विकास, स्वाध्याय यासह सामाजिक जीवनासाठी आवश्यक कार्ये यावर चर्चा केली आणि त्यासोबत परस्पर अनुभवांची देवाणघेवाण केली जाईल. प्रत्येकजण आपापल्या कार्याची आणि अनुभवांची यावेळी सविस्तर चर्चा करेल. दिव्यांगजन, तरुण आणि महिला सबलीकरण, स्वावलंबन, सुरक्षा, सेंद्रिय शेती, जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, भटक्या विमुक्तांचे कार्य, व्यसनमुक्ती यांसारख्या राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याबाबत सतत सक्रिय असलेले सर्व कार्यकर्ते विचारमंथन करतील.

Powered By Sangraha 9.0