अमन अन्सारीने युवतीला विवाह करण्यास आणला दबाव

26 Oct 2024 18:30:22

Aman Ansari
 
कोतवाली : उत्तर प्रदेशातील कोतवाली भागात मैनपुरी येथे कट्टरपंथी तरुण अमन अन्सारी (Aman Ansari) एका हिंदू कुटुंबातील अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर निकाहासाठी दबाव टाकत होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमन अन्सारीला अटक केली आहे. अमन अन्सारी हा मंगळवारी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलीच्या घरात घुसला आणि तिला काठीने मारहाण केली.
 
मैनपुरीच्या कोतवाली भागात कट्टरपंथी अमन अन्सारीने एका हिंदू कुटुंबातील अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमन अन्सारीला त्याच्या घरातून अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
 
 
 
दरम्यान याप्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने आईला कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत म्हटले की, अमन अन्सारीच्या धमक्यांमुळे पीडितेने आपल्या शाळेची परिक्षा चुकवली होती. तो मुलीवर लग्नासाठी दबाव टाकत होता.
 
पीडितेच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा प्राधान्याने तपास सुरू केला. यानंतर कोतवालीचे निरीक्षक फतेह बहादूर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने त्याच्या घरावर छापा घातला. त्यानंतर .याप्रकरणात आरोपी अमन अन्सारीला अटक केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0