Apple देतयं फ्रेशर्सना संधी! तुम्हीही करू शकता अर्ज!

25 Oct 2024 14:54:45
 
APPLE
 
मुंबई : ( Apple )'ॲपल' कंपनी सध्या भारतात व्यवसायविस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार चार नवीन रिटेल स्टोअर्ससाठी ॲपल कंपनी तब्बल ४०० लोकांना नियुक्त करणार असल्याची माहिती आहे. हे स्टोअर्स देशातील बेंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई या ४ शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.
 
कंपनीने या स्टोअर्ससाठी आपल्या नोकरीसंदर्भातील वेबसाइटवर अनेक नोकरींच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच कंपनीच्या मुंबई आणि दिल्लीतील स्टोअर्सप्रमाणेच पूर्णवेळ आणि अर्धवेळ अश्या दोन्ही कर्मचाऱ्यांसाठीच्या पदांचा समावेश केलेला आहे. यामध्ये बिझनेस प्रो, बिझनेस एक्सपर्ट, क्रिएटिव, ऑपरेशन्स एक्सपर्ट, टेक्निकल स्पेशालिस्ट यांसारखी अनेक पदे व त्यासाठीची कौशल्ये व शैक्षणिक पात्रता या बाबींचा समावेश केला आहे. नवीन पदवीधरांसाठी म्हणजेच फ्रेशर्ससाठी 'ॲपल' सारख्या जगविख्यात कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे
 
एप्रिल २०२३ मध्ये 'ॲपल' कंपनी ने भारतात त्यांचे पहिले दोन स्टोअर्स दिल्ली (Apple Saket) आणि मुंबई (Apple BKC) येथे सुरू केले होते. 'ॲपल' ने २०१७ मध्ये भारतात पहिल्यांदा आयफोनचे मॅन्युफॅक्चरींग सुरू केले, आणि आता भारतात त्यांचे जवळपास ३,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
 
 
 
.
Powered By Sangraha 9.0