काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत दाखल!

    25-Oct-2024
Total Views |
 
Zeeshan Siddique
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून वांद्रे पूर्व विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे वरुण सरदेसाई मैदानात असतील.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झीशान सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला.
 
झीशान सिद्दीकी म्हणाले की, "अनेक लोकांनी अनेक राजकीय गोष्टी केल्या. मी माझे वडील गमावले. त्यावेळीसुद्धा अनेकांनी चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं. काँग्रेस नेहमीच उबाठा गटाच्या दबावात असते. राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. या कठीण प्रसंगी ज्यांनी आमची साथ दिली मी त्यांच्यासोबत कायम राहील," असे ते म्हणाले.