नवी दिल्ली : संजीव खन्ना यांची भारताचे ५१ वे सरन्यायाधीश (Sanjeev Khanna 51st Chief Justice) म्हणून निवड करण्यात आली. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काही वेळांआधी घोषणा केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मागील आठवड्यातच संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. दरम्यान चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावानंतर संजीव खन्ना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील असे सांगण्यात आले आहे. याचदरम्यान विद्यमान सरन्यायाधीश यांचा कालावधी लवकरच संपले.
कोण आहेत न्या. संजीव खन्ना?
संजीव खन्ना यांचा जन्म हा १४ मे १९६० रोजी झाला. त्यांनी काही काळ न्यायिक क्षेत्रात काम केले. १९८३ साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य म्हणूनही धुरा सांभाळली होती. तसेच जिल्हा न्यायालय तीस हजारी कोर्टनंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि विविध लवांदमध्ये वकिलीचे काम केले होते. कायदा, कर आकारणी आणि विविध लवाद, व्यावयासिक कायदे, कंपन्या आणि संस्थांचे कायदे, तसेच पर्यावरण कायदे अशा अनेक क्षेत्रात काम केले.
न्यायमूर्ती खन्ना यांनी प्राप्तिकर विभागासाठी वरिष्ठ वकील म्हणून काम केले. तसेच २००४ रोजी दिल्ली येथील सिव्हिल विभागात वकिली केली. तसेच २००५ साली त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर २००६ साली न्यायमूर्ती झाले. तसेच २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली. २०२३ या वर्षात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.