काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ लष्करांच्या वाहनांवर गोळीबार

25 Oct 2024 15:43:27
 
Kashmir
 
जम्मू-काश्मीर : काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ गुरुवारी दहशतवाद्यांनी वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराने दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोन लष्कर जवान जखमी झाले आहेत. तसेच लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या दोन जणांचाही मृत्यू झाल्याची घटना आहे. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. या झालेल्या हल्ल्यात जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर आता भारतीय लष्करांच्या जवानांकडून दहशतवाद्यांचा नाहीनाट करण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
 
काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घङत आहेत. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथे गांदरबल जिल्ह्यात गगनगीर भागात मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना आहे.
 
 
 
काश्मीर येथे गुलमर्ग भागात हा हल्ला झाला आहे. या हल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यबुटा पाथरी येथे हा हल्ला झाला असून संबंधित भागात सुरक्षा दल असून दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती एका वृत्तमाध्यमाने दिली आहे. एका आठवड्यानंतर हा चौथा हल्ला करण्यात आला असल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे आता उमर अब्दुल्लांनी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले आहे.
 
 
 
काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
 
उमर अब्दुल्लांचे नुकतेच जम्मू-काश्मीर येथे सरकार आले आहे. त्यानंतर एकामागोमाग एक दहशतवादी हल्ले होत आहेत. अशातच त्यांनी स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काश्मीरच्या बुटा पाथरी भागात लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याची घटना दुर्देवी असल्याची बातमी आहे. ज्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. काश्मीर येथे होत असलेले हल्ले गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचे उमर अब्दुल्ला म्हणाले. या हल्ल्याने चिंतेची बाब निर्माण झाली असल्याची चिंता उमर अब्दुल्लांनी व्यक्त केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0