विरोधकांसाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

25 Oct 2024 13:02:02
 
Devendra Fadanvis
 
नागपूर : विरोधकांसाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. ते शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी संविधान चौक ते आकाशवाणी चौक अशी भव्य रॅली काढली. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्यापेक्षा आपलं काम बोलत असल्याने आपल्याला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. गडकरी साहेबांच्या नेतृत्वात नागपूर शहरात केलेला बदल लोक डोळ्याने पाहत आहे. आम्ही नागपूर शहर बदलून दाखवलं. विदर्भात मोठं परिवर्तन केलं. नागपूर, अमरावती विमानतळ, वैनगंगा-नळगंगा योजना, गोसेखुर्द, सिंचन प्रकल्प, समृद्धी महामार्ग अशी अनेक कामं झालीत. देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवभारताची निर्मिती सुरु केली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही नवमहाराष्ट्राची निर्मिती सुरु केली असून तो युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा असेल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  औक्षण 'विजयाचे'! उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटूंबियांकडून फडणवीसांचे औक्षण
 
"विरोधकांविषयी मी काही बोलणार नाही. त्यांना आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहेत. ज्या लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास पळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी नागपूरच्या न्यायालयात केस केली त्या बहिणीच त्यांना पुरून उरतील. ओबीसी समजाकरिता ४८ जीआर काढणारं महायूतीचं सरकार आहे. काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्या काळातील ओबीसींसाठीचा एक तरी जीआर दाखवावा. या निवडणूकीत दक्षिण-पश्चिम नागपूरची जनता मला सहाव्यांदा आशीर्वाद देणार आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0