बारावीत शिकणाऱ्या बांगलादेशी हिंदू मुलीचे पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र

25 Oct 2024 17:32:54

Letter to PM Modi
(Bangladeshi Girl Letter to PM Modi)

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर आजही हिंदूंना टार्गेट केलं जात आहे. येथील महिलांवर खुलेआम अत्याचार होत आहेत. नव्याने स्थापन झालेले युनूस सरकारसुद्धा याबाबत कठोर भुमिका घेताना दिसत नाहीत. याप्रकरणी बांगलादेशच्या समस्त हिंदू बांधवांच्या वतीने येथील बारावीत शिकणाऱ्या एका हिंदू मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावनिक पत्र लिहिले आहे. हे पत्र सध्या समाज माध्यमांवर चांगलंच व्हायरल होत आहे.

हे वाचलंत का? : उत्तरकाशीत हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांवर लाठीचार्ज

ती मुलगी आपल्या पत्रात लिहिते की, "या देशात घडत असलेली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हिंदूंवर होणारा आघात. आम्ही खूप वाईट परिस्थितीत जगत आहोत, ज्याचे वर्णन मी शब्दातही करू शकत नाही. काही कट्टरपंथी दहशतवादी गटांकडून महिला व मुलींवर अकल्पनीय असे निर्घृण अत्याचार होत आहेत. ते हिंदूंच्या घरांवर आणि मंदिरांवर गोळीबार करत आहेत. हिंदूंच्या व्यवसायाची लूट आणि तोडफोड करत आहेत. लाखोंची उधळपट्टी करत असून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीसुद्धा देत ​​आहेत."

पुढे तिने लिहिले की, "सोशल मीडियावर प्रत्येकजण जे पाहतो त्यापेक्षा खूपच वाईट परिस्थिती त्याठिकाणी आहे. आम्हाला आमचा देश सोडण्यास सांगितले जात आहे. पण का? आम्हाला आमच्या देशात सर्व अधिकारांसह राहण्याचा अधिकार आहे. अशा सर्व दुष्ट शक्तींना कायमचे रोखण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. मला वाटते अशा कट्टरपंथींना या पृथ्वीवरच राहण्याचा अधिकार नाही."


पंतप्रधान मोदींना विनंती करत ती म्हणाली, शक्य तितक्या लवकर आमच्यासाठी (बांगलादेशी हिंदूंसाठी) काहीतरी करा. आपण आपल्या देशात सर्व अधिकारांसह शांततेत जगणे हे सर्वात महत्वाचे आहे. मला माहीत आहे की तुम्हा सर्वांना आमची काळजी आहे. बांगलादेशातील सर्व हिंदूंच्या वतीने मी तुम्हाला विनंती करते की कृपया लवकरात लवकर आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सध्या आमच्यासाठी जे काही करत आहात त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. त्याच बरोबर मी भारतातील लोकांचे त्यांच्या चिंता आणि आमच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छिते. परमेश्वरा वाचव आम्हाला..."


Powered By Sangraha 9.0