नवी दिल्ली : वयाचा पूरावा म्हणून अधारकर्ड (Aadhaar card) स्वीकारण्यावर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मोटार अपघातात नुकसान झालेल्या भरपाईच्या प्रकरणी पीडितेचे वय निश्चित करण्यासाठी आता आधारकार्डमध्ये नमूद असलेली जन्मतारीख स्वीकारणारा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालायाने फेटाळला आहे.
प्रसारमाध्यमानुसार, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय कोरल आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही असा निकाल दिला आहे. यापार्श्वभूमीवर आता न्यायालयाने सांगितले की, मृत व्यक्तीचे वय हे अधारकार्डऐवजी शालेय कागदपत्रांवरून निश्चित केले जाईल.
मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणी पीडितेचे वय निश्चित करण्यासाठी आधार कार्डमध्ये दिलेली जन्मतारीख स्वीकारणारा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ते बाल न्याय कायदा २०१५ च्या कलम ९४ अंतर्गत मान्यताप्राप्त आहे.
हे प्रकरण नुकसान भरपाईशी संबंधित असल्याची माहिती आहे. याप्रकरणात असलेला अपघात दावा न्यायाधिरकरणाद्वारे १९. ३५,४०० रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आली होती. यामध्ये घट झाली असून ९,२२.३३६ रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.