रोहिंग्यांना नो एन्ट्री

24 Oct 2024 23:18:00

 Rohingya
 
रोहिंग्या मुस्लिमांचा गट ज्यामध्ये काही महिला व मुलांचाही समावेश होता, ते मलेशियाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा इंडोनेशियाच्या आचे प्रांताच्या किनारपट्टीवर आले असता, स्थानिकांनी त्यांच्या घुसखोरीचा निषेध केला व त्यांना बोटीतून खाली उतरू दिले नाही.
 
इस्लाम हा इंडोनेशियातील सर्वात मोठा धर्म. २०२३ मधील आकडेवारीनुसार, तेथील लोकसंख्येपैकी ८७.०६ टक्के नागरिक हे इस्लामधर्मीय. त्यामुळे इंडोनेशियाकडे ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून पाहिले जाते. असे असतानाही या देशात रोहिंग्या मुस्लिमांची घुसखोरी रोखल्याची घटना नुकतीच घडली आहे. १४० रोहिंग्या मुस्लीम घुसखोरांचा एक गट इंडोनेशियातील आचे प्रांताच्या किनारपट्टीवर पोहोचला होता. परंतु, स्थानिक मासेमारी समुदायाने त्यांना जमिनीवर पाय ठेवू दिला नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे बांगलादेशने रोहिंग्यांना स्वीकारण्यास नकार दिला, तशीच अवस्था इंडोनेशियाचीही.
 
रोहिंग्या मुस्लिमांचा गट ज्यामध्ये काही महिला व मुलांचाही समावेश होता, ते मलेशियाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा इंडोनेशियाच्या आचे प्रांताच्या किनारपट्टीवर आले असता, स्थानिकांनी त्यांच्या घुसखोरीचा निषेध केला व त्यांना बोटीतून खाली उतरू दिले नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, ही घटना इंडोनेशियाच्या लबुहान हाजीजवळ घडली. बांगलादेशातील कॉक्स बाजार येथून सुमारे दोन आठवड्यांचा सागरी प्रवास करत एका लाकडी बोटीतून हे १४० रोहिंग्या मुस्लीम इंडोनेशियाच्या दिशेने निघाले होते. जेव्हा ही बोट आचेच्या किनार्‍यापासून ०.६० किमीवर पोहोचली, तेव्हा स्थानिक मच्छीमार आणि रहिवाशांनी त्यांना विरोध केला. स्थानिक मच्छीमार समुदायाचे प्रमुख मोहम्मद जबल यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की, “स्थानिक मच्छीमार समुदाय रोहिंग्या मुस्लिमांना इंडोनेशियाच्या धरतीवर उतरू देणार नाही. कारण, पूर्वीच्या अनुभवांनुसार रोहिंग्या मुस्लीम जिथे गेले, त्याठिकाणी स्थानिक लोकांशी संघर्ष आणि अशांततेची परिस्थिती निर्माण झाली होती.”
 
आचे पोलिसांच्या अहवालानुसार, रोहिंग्या मुस्लिमांचा हा गट दि. ९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशातील कॉक्स बाजार येथून निघाला होता आणि त्यांचे मूळ लक्ष्य मलेशिया गाठण्याचे होते. या प्रवासादरम्यान, बोटीवरील काही प्रवाशांनी इतर देशांमध्ये पोहोचण्यासाठी पैसेही भरल्याची माहिती आहे. तथापि, ही बोट इंडोनेशियाला पोहोचेपर्यंत जहाजावर एकूण २१९ लोक होते. त्यापैकी ५० जण इंडोनेशियाच्या रियाउ प्रांतात उतरले. मात्र, स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांच्या विरोधामुळे घुसखोरांना पुन्हा बोटीवरच थांबावे लागले. आचे पोलिसांनी मानवी तस्करीच्या संशयावरून तिघांना अटक केल्याची माहिती आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये म्यानमारमधून होणारे रोहिंग्या मुस्लिमांचे स्थलांतर हा एक संवेदनशील मुद्दा. २०१७ सालामध्ये म्यानमारच्या सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवायांमुळे सुमारे ७ लाख, ४० हजार रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमारमधून पलायन केले आणि बांगलादेशमध्ये आश्रय घेतला. इंडोनेशियातील ८७ टक्के लोकसंख्या इस्लाम धर्माची असली तरी, ते सातत्याने घुसखोरी करणार्‍या रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवत आहेत. बांगलादेशातून येणारे मुस्लीम रोहिंग्या शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडोनेशियामध्ये नोव्हेंबरपासून निर्वासितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
 
एकीकडे देशात बेकायदेशीरपणे स्थायिक झालेल्या ४० हजारांहून अधिक रोहिंग्या घुसखोर मुस्लिमांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. २०१२ सालापासून भारतात रोहिंग्या मुस्लिमांची संख्या वाढली असून, गृहमंत्रालयाने ‘यूएनएचआरसी’चा हवाला देत सांगितले की, “डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात १८ हजार रोहिंग्या मुस्लिमांची उपस्थिती असल्याची माहिती आहे.”
 
देशाच्या सीमावर्ती भागात अशा घुसखोरीच्या बातम्या आपण बर्‍याचदा पाहतो. त्यामुळे ती बेकायदा घुसखोरी रोखण्यासाठी सीमावर्ती भागातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य पाऊल उचलण्याची वेळ आहे. त्यांच्यात जनजागृतीचे कार्य समाजातील विविध संघटना त्यांच्यापर्यंत पोहोचून करत आहेतच. मात्र, आता प्रत्येक भारतीयाने याबाबत विचार करून मुस्लीम रोहिंग्यांची भारताला लागलेली कीड ठेचावी लागेल. त्यासाठी इंडोनेशियातील मच्छीमार समुदायाने घेतलेल्या भूमिकेचा विचार प्रत्येकाला करावा लागेल.
Powered By Sangraha 9.0