शेकडो हिंदू पोलिसांंना नोकरीतून केले बडतर्फ

24 Oct 2024 19:30:57

Bangladesh Police

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu Police Fired)
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरुच आहे. येथील शिक्षकांनंतर आता सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या अल्पसंख्याकांचाही छळ होत असल्याची माहिती समोर आली आहे. कट्टरतावादी यूनुस सरकार विविध सबबी सांगून हिंदूंना नोकरीतून काढून टाकत आहे. व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत १०० हून अधिक हिंदू पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

हे वाचलंत का? :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देणाऱ्या इम्रान मसूदच्या अडचणीत वाढ
 
सोशल मिडियावर ही बातमी व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला असून या सर्व कृत्याला बांगलादेशच्या युनूस सरकारला जबाबदार धरले जात आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, बांगलादेशात पूर्णतः नरसंहाराची तयारी सुरू आहे. त्यात पहिली पायरी म्हणजे पोलीस आणि लष्कराला संपवण्याचे कार्य सुरु आहे. नवरात्रीच्या काळात ढाका, चितगावसह अनेक ठिकाणी इस्लामिक कट्टरपंथीयांनी दुर्गापूजा मंडपांवर हल्ले केले, हिंदूंना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले; तेव्हा बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावादाचे गंभीर दृश्य दिसले.
Powered By Sangraha 9.0